शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (14:00 IST)

अभिनेता अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाची प्रकरणे दिवसंदिवस वाढत आहे. आता कोरोनाचा संसर्ग बॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. 
अर्जुन कपूर अलीकडेच त्याची मैत्रीण मलायका अरोराच्या घरी ख्रिसमस पार्टी साजरी करण्यासाठी गेला होता. या पार्टीत मलायका अरोराची बहीण अमृता आणि करीना कपूर या देखील होत्या. मलायका अरोराची पुन्हा एकदा कोरोना चाचणी होणार आहे.