Dharma Sangrah
✕

अभिनेते संतोष बलराज यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन

Updated: मंगळवार, 5 ऑगस्ट 2025 (17:01 IST)
ALSO READ: मल्याळम अभिनेता शानवास यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन
 संतोष बलराज यांना काही काळापूर्वी कावीळ झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते असे सांगितले जात आहे. सुरुवातीला त्यांची प्रकृती ठीक वाटत होती, परंतु काही दिवसांनी त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडली. या गंभीर आजाराने त्यांचा जीव घेतला.
 
संतोष यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत प्रामुख्याने कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना तसेच कन्नड चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. 
ALSO READ: प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन
संतोषने 2009 मध्ये 'केम्पा' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी अविनाश, रुचिता प्रसाद आणि प्रदीप सिंह रावत सारख्या कलाकारांसोबत काम केले. त्यांचा दुसरा चित्रपट 'करिया 2' होता, जो त्यांचे वडील अनेकल बलराज यांनी संतोष एंटरप्रायझेसच्या बॅनरखाली तयार केला होता.
ALSO READ: प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात, महामार्गावर दुभाजकाला गाडी धडकली
या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. 'करिया 2' मध्ये अजय घोष, मयुरी क्यातारी, साधू कोकिला आणि नागेश कार्तिक यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.संतोषच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये 2015 मध्ये प्रदर्शित झालेला 'गणपा' आणि 2024 मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला 'सत्यम' यांचा समावेश आहे
संतोष त्याच्या आईसोबत राहत होता आणि त्याने कधीही लग्न केले नाही. त्याच्या अकाली निधनाने त्याचे कुटुंब आणि इंडस्ट्रीतील लोकांना खूप दुःख झाले आहे. 
Edited By - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

पुढील लेख
Show comments