रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2024 (16:08 IST)

अभिनेत्री आदिती राव हैदरीने सिद्धार्थशी गुपचूप लग्न केले!

Aditi Rao Hydari
अदिती राव हैदरी तिच्या आगामी हिरामंडी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे, पण त्याच दरम्यान एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदितीने तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत हैदराबादमधील एका मंदिरात लग्न केले आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी या जोडप्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
 
अभिनेता सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांचे तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगपूर येथील श्री रंगनायकस्वामी मंदिरात आज लग्न झाल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेचा भाग बनल्या होत्या. आदिती राव आणि सिद्धार्थ बऱ्याच दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. 2021 मध्ये ‘महा समुद्रम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले होते.
 
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून गाजत होत्या. खरं तर, गेल्या वर्षभरापासून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली होती, यासोबतच हे दोन्ही कलाकार अनेकदा एकत्र दिसले आहेत. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता दोघांनी लग्न करून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, हा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या नातेवाईकांमध्ये पार पडला.
 
अभिनेत्री अदिती आणि सिद्धार्थचे पारंपारिक रितीरिवाजानुसार लग्न झाले, या जोडप्याच्या लग्नासाठी तामिळनाडूतील पुजाऱ्यांना बोलावण्यात आले होते, दोघांचे लग्न ज्या मंदिरात झाले ते वाणपर्थीमध्ये आहे आणि त्यामुळे या ठिकाणाहून आदितीचे खास नाते आहे.
 
सिद्धार्थ लवकरच कमल हासनच्या इंडियन 2 चित्रपटात दिसणार आहे. ही अभिनेत्री संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या मालिकेत दिसणार असून ती ताज डिवाइड बाय ब्लड या शोमध्ये दिसली होती. मात्र ताज डिव्हायडेड बाय ब्लडला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
 
Edited by - Priya Dixit