गजरा माळल्यामुळे 1.25 लाखांचा दंड!
गजरा घालून विमानतळावर पोहोचलेली अभिनेत्री, लाखोंचा दंड भरावा लागला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर हिला एका विचित्र आणि धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मल्याळी समुदायाने आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती, पण तिथे पोहोचताच तिच्यासोबत अशी घटना घडली, ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. गजरा माळल्याने अभिनेत्रीने मोठी रक्कम मोजली.
मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याला त्रास सहन करावा लागला जेव्हा ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने तिच्या हँडबॅगमध्ये ठेवलेल्या चमेलीच्या फुलांमुळे तिला थांबवले.
१५ सेमी लांबीची छोटी चमेलीची माळ घेऊन गेल्याबद्दल तिला १९८० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे १.२५ लाखचा मोठा दंड भरावा लागला. ओणम उत्सवाच्या व्यासपीठावरून तिने स्वतः ही घटना शेअर केली.
Edited By- Dhanashri Naik