1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 10 जून 2024 (11:48 IST)

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बनत आहे नवरी, बॉयफ्रेंड जहीर इकबाल सोबत अडकणार विवाहबंधनात

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा वेब सिरीज 'हिरामंडी'  मध्ये फरिदन चे पात्र करून सर्वदूर चर्चेत आहे. या दरम्यान ती खाजगी आयुष्याला घेऊन चर्चेत आली आहे. सोनाक्षी गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेता जहीर इकबाल ला डेट करीत आहे. 
 
आता सोनाक्षी आणि जहीर इकबालच्या विवाहाबद्दल बातम्या समोर येत आहे. सांगितले जाते आहे की, सोनाक्षी सिन्हा 23 जून 2024 ला बॉयफ्रेंड जहीर इकबाल सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. हे एक खाजगी फंक्शन असणार आहे. ज्यामध्ये कुटुंब सदस्य आणि मित्रपरिवार सहभागी होणार आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षी सिन्हा ने आपल्या खास दिवसांमध्ये हिरामंडी च्या पूर्ण कास्टला देखील आमंत्रित केले होते. तसेच या कपलने आपल्या वेडिंग आमंत्रणाला एक मॅगजीन च्या कवर प्रमाणे डिजाईन केले आहे आणि यामध्ये एक नोट आहे, 'अफवा सत्य आहे' 
 
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यांच्या विवाह संबंधित कोणतीही अधिकारीक माहिती समोर आलेली नाही. सोनाक्षी आणि जहीर यांची भेट सलमान खानच्या पार्टीमध्ये झाली होती. यानंतर दोघांची मैत्री प्रेमामध्ये बदलली. दोघांनी चित्रपट 'डबल एक्सएल' मध्ये काम केले आहे. 
 
जहीर इकबाल सलमान खानचे मित्र इकबाल रतनसी यांचा मुलगा आहे. त्यांनी सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेला चित्रपट 'नोटबुक' मधून बॉलिवूड मध्ये डेब्यू केला होता. तर सोनाक्षीने आपल्या करियरची सुरवात सलमान खानचा चित्रपट 'दबंग' यामधून बॉलिवूड मध्ये एंट्री केली होती.