गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2024 (11:44 IST)

अभिनेत्रीने चोरले 150 तोळे सोने!, अभिनेत्रीला अटक

arrest
एका तेलगू अभिनेत्रीने एका सेवानिवृत्त पोस्टल कर्मचाऱ्याच्या घरातून 150 तोळे सोने चोरल्याचा आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्रीने चार वेगवेगळ्या चोरी केल्याचा घटना घडल्या आहे. चोरी नंतर अभिनेत्री चक्क मजा करण्यासाठी गोव्याला गेल्याची माहिती मिळाली आहे. सौम्या शेट्टी असे या अभिनेत्रींचे नाव आहे. 

तेलगू अभिनेत्री सौम्या शेट्टी हिने विशाखापट्टणमधील एका सेवानिवृत्त पोस्टल कर्मचाऱ्याच्या घरातून 150 तोळे सोने चोरले असून तिने चार वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केली आहे. 
 
अभिनेत्रीने फिरण्यासाठी चोरी करून पैसे गोळा करून मौज करण्यासाठी गोवा गेली. तिने चोरी केलेले सोने विकले आणि रकम घेऊन गोवा गाठले तिथे तिने रील बनवले. 

पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यावर अभिनेत्रीने सेवानिवृत्त पोस्टल कर्मचाऱ्याच्या घरातून चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी तिच्याकडून 74 ग्राम सोने जप्त केले असून तिला ताब्यात घेतले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit