शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2023 (19:30 IST)

Afwaah अफवाहच्या प्रदर्शनापूर्वी भूमी पेडणेकर हीची ही पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय !

अफवाहची चर्चा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असताना अभिनेत्री भूमी पेडणेकर हीची पोस्ट सोशल मीडिया चर्चेचा विषय ठरतेय.  नवाजुद्दीन सिद्दीकी आणि भूमी पेडणेकर यांची अनोखी जोडी असलेला चित्रपट 5 मे, 2023 रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या  प्रदर्शनापूर्वी भूमी पेडणेकरचा हिने तिच्या दर्शकांसाठी एक विशेष विचार करायला लावणारा प्रश्न विचारला आहे आणि काय आहे तो प्रश्न बघू या !
 
भूमीने तिच्या सोशल मीडियावर कॅप्शनसह पोस्ट शेअर केली, "आप भी यही करते है ना? बिना सोचे समझे मेसेज को फॉरवर्ड! एक # अफवाह जिसने रहाब और निवी की जिंदगी बदल दी आ रहा है आप तक सिरफ 2 दिन में!
 
#Afwaah या शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

व्हिडिओमध्ये भूमी खरी पडताळणी न करता 'फॉरवर्ड केलेले' नकारात्मक संदेश वाचताना दिसत आहे. ती तिच्या सर्व दर्शकांना देखील विचारते की त्यांनी असेच मेसेज केले का आणि 'अफवाह' किती तीव्रतेने तुमचा पाठलाग करणं थांबवत नाही आणि अश्या अफवा मुळे काय घडू शकतं हे यातून कळणार आहे.
 
अफवाहची कथा एका चुकीच्या अफवेने तीन जीवनात गोंधळ आणि कहर कसा घडवून आणला आहे याभोवती या चित्रपटाची गोष्ट फिरते. चित्रपटात एका खोट्या अफवेचे परिणाम देखील दाखवले आहेत आणि तो एक राक्षस आहे जो तुमचा पाठलाग करणे थांबवत नाही. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्या नंतर अता चित्रपटा ची सगळ्यांना उत्सुकता आहे.
 
सुधीर मिश्रा दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, भूमी पेडणेकर, शारीब हाश्मी, सुमित कौल, सुमीत व्यास, रॉकी रैना आणि टीजे भानू यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या बनारस मीडिया वर्क्स या बॅनरखाली तयार केला आहे आणि 5 मे 2023 रोजी रिलीज होणार आहे.