suvichar
✕

दृष्यम २ला तुफान प्रतिसाद मिळत असल्याने अजय देवगणने केली ही घोषणा

Updated: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (15:19 IST)
 
अजय देवगण आणि तब्बू यांनी ‘दृश्यम’ आणि त्याच्या सिक्वेलमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांचा हा ८ वा चित्रपट आहे. ८ चित्रपटांतून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवल्यानंतर हे दोन्ही प्रतिभावान कलाकार भोला या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु २०२३ च्या सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. ‘भोला’चे शूटिंग ऑगस्टमध्ये पूर्ण झाले. आता अभिनेत्याने चित्रपटाचा एक छोटा व्हिडिओ शेअर करून टीझरची घोषणा केली आहे. हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होणार असून तो अजय देवगणने दिग्दर्शित केला आहे.
 
‘दृश्यम २’ ला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित, चित्रपटाने थिएटरमध्ये प्रचंड प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.३८ कोटी, दुसऱ्या दिवशी २१.५९ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २७.१७ कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ६४.१४ कोटी रुपये आहे. एका आठवड्यात चित्रपटाचे एकूण कलेक्शन १०० कोटींच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे. ‘दृश्यम 2’ हा ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. तीन दिवसांत चित्रपटाने एकूण खर्चापेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याचबरोबर आगामी काळात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

खतरों के खिलाड़ी 15चा विजेता अविनाश मिश्रा; ट्रॉफीसोबत लाखो रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली

अजय देवगणच्या 'दृश्यम ३' ने तीन दिवसांत धुमाकूळ घातला, २०० कोटींचा टप्पा ओलांडला

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले ''भवानी माता मंदिर प्रतापगड'' सातारा

अजय देवगणच्या 'दृश्यम ३: द कन्क्लुजन'ने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे विक्रम मोडत जगभरात धुमाकूळ घातला

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सिंगीथम श्रीनिवास राव यांचे निधन

पुढील लेख
Show comments