हाऊस अरेस्ट वादानंतर अजाज खानवर शारीरिक शोषणाचा आरोप, तक्रार दाखल
अभिनेता एजाज खानविरुद्ध रविवारी, 4 मे रोजी शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने एजाजवर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, महिलेने आरोप केला आहे की, चित्रपट उद्योगात प्रवेश देण्याच्या बहाण्याने अभिनेत्याने तिचे शारीरिक शोषण केले.
चारकोप पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एका 30 वर्षीय महिलेने अलिकडेच तक्रार दाखल केली होती की एजाज खानने तिला चित्रपटात भूमिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, तिला धर्मांतर करून लग्न करण्याचे आश्वासन देऊन, त्याने अनेक ठिकाणी तिचे शारीरिक शोषण केले. अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या बलात्काराशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.
एजाज 'हाऊस अरेस्ट' या रिअॅलिटी शोमधील अश्लील कंटेंटमुळे आधीच वादात आहे. शोमधील आक्षेपार्ह टास्क आणि डायलॉग्समुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली, त्यानंतर शो आणि एजाजला खूप ट्रोल केले जात आहे. उल्लू अॅपच्या 'हाऊस अरेस्ट' या वेब शोमध्ये अश्लील सामग्री दाखवल्याबद्दल एजाज खानसह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit