गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (15:12 IST)

See Video : “अक्‍सर-2’चा ट्रेलर रिलीज

“अक्‍सर-2′ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सलमान खान सोबत डेब्यू करणारी झरीन खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. झरीन सोबत टीव्हीचा फेमस अभिनेता गौतम रोडे एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात क्रिकेटर श्रीसंत ही एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या सोबत अभिनव शुक्‍लानेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
“अक्‍सर-2’मध्ये प्रेक्षकांना थ्रिल आणि सस्पेंस सोबत रोमांसही अनुभवता येणार आहे. ट्रेलर पाहिल्यास तुम्हाला अंदाज आलाच असेल की, या चित्रपटाचे कथानक प्रेम, धोका आणि जुनून आदी बाबींच्या अवती-भवती आहे. पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या क्रिकेटपटू श्रीसंतचीही ट्रेलरमध्ये झलक दिसून येते. मात्र, जोपर्यंत तुम्ही त्याला पाहता तोपर्यंत तो काही क्षणातच अदृश्‍य होते.
 
हा चित्रपट अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केला असून 2006मध्ये इमरान हाश्‍मी आणि उदिता गोस्वामी यांच्या “अक्‍सर’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटातही अशा दृश्‍यांचा भडिमार आहे, जे अत्यंत हॉट आणि बोल्ड आहेत. चित्रपटाचे कथानक खंबाटाच्या अवती-भवती असून ही भूमिका लिलेट दुबे हिने साकारली आहे. खंबाटा ही एक गर्भश्रीमंत महिला असून इन्वेस्टमेंट बॅंकर तिचा गैरफायदा घेण्याचे षडयंत्र रचतात. मात्र, त्यानंतर त्यांच्यासमोर येणारे खुलासे हे धक्कादायक असता. चित्रपटात झरीन खाने आपला हॉट अंदाज कायम ठेवला असून हा चित्रपट 6 ऑक्‍टोंबर रोजी प्रदर्शीत होणार आहे.