रविवार, 18 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बिग बीसोबत ग्लॅमर्स लुकमध्ये दिसणार अमृता फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अमिताभ बच्चनसोबत म्युझिक व्हिडिओत ग्लॅमर्स लुकमध्ये
मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर येत आहे. अमृता एक चांगल्या गायिका आहे हे तर सर्वांना माहीत आहे पण आता त्या एका नव्या ग्लॅमर्स लुकमध्ये दिसणार आहेत. 
 
मिसेस मुख्यमंत्री आणि अमिताभ बच्चन हे दोघे एका म्युझिक व्हिडिओत दिसणार आहे. मुंबईतील ऑपेरा हाउसमध्ये या व्हिडिओचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. यावेळी अमृता यांचा निराळाच अंदाज पाहायला मिळाला.

लाल रंगाच्या वनपीस आणि हाय हिल्समध्ये अमृता यात बिग बी सोबत डांस करताना दिसत आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी स्वत: हे गाणेही गायलेले आहे. कोरिओग्राफर अहमद खान यांनी या व्हिडीओसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता लागून राहिली आहे.