शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिनेता अनिल कपूरच्या "नाईट मॅनेजर २ " मधील शेली रुंगटा या भूमिकेचं कौतुक

" द नाईट मॅनेजर " या बहुचर्चित वेब सीरिज चा दुसरा भाग येताच त्याचा सोशल मीडिया वर चर्चा सुरू झाल्या आहेत. या वेब सीरिज मध्ये एका भूमिकेचं विशेष कौतुक ते म्हणजे अभिनेता अनिल कपूर ! या अभिनेत्याने त्याचा जबबरदस्त अभिनयाने पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकली aanim शेली रुंगटा हे अनोखं पात्र साकारल. " द नाईट मॅनेजर  २ " मध्ये अनिल च्या कामाचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय.
 
पहिल्याच फ्रेमपासून अनिल कपूर याचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवतो त्याचं व्यक्तिमत्व अभिनयाची अनोखी शैली प्रत्येक फ्रेम मध्ये दिसते. तो खऱ्या अर्थाने अष्टपैलुत्व अभिनेता म्हणून स्वतःच वेगळं स्थान निर्माण करतो.
 
द नाईट मॅनेजरच्या पहिल्या सीझन मध्ये अनिल कपूर यांची अफाट प्रतिभा दाखवली होती तर दुसरा सीझन मध्ये अनिल या  शोचा खरा स्टार म्हणून बघायला मिळतोय. समीक्षक आणि चाहत्यांनी या कामाचं आजपर्यंतची त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणून अस कौतुक केलं. 
 
द नाईट मॅनेजर पार्ट 2 ला प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. सोशल मीडिया वर प्रेक्षक याचा चर्चा करताना दिसतात. 
 
" द नाईट मॅनेजर पार्ट २ " हा अनिल कपूर यांच्या कामाचा मास्टर पिस आहे असं म्हणायला हरकत नाही. अनिल यांच्या कामाचा कॅनव्हास असाच  बहरत राहणार आहे यात शंका नाही !