शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (10:46 IST)

अनिलने बनवली तरुणांना लाजवेल अशी बॉडी

‍ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. करोनाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत  वाढवण्यात आला आहे. अशातच अनेक चित्रपट आणि मलिकांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कलाकार सध्या घरात बसून कुटुंबीयांसोबत वेळ घालवत असून आवडीची कामे करताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांचा फोटो व्हायरल झाला आहे.

नुकताच अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना संदेश देखील दिला आहे. ही पोस्ट करण्यामागचे कारण शो ऑफ करणे किंवा स्वतःची प्रशंसा करणे असा नाही.

पण तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितो. जर तुम्हाला वाटत असेल की अशी बॉडी बनवण्यासाठी सप्लिमेंटवर पैसे खर्च करावे लागत असतील. तर असे नाही. मी बॉडी बनवण्यासाठी कोणतीही सप्लिमेंट घेतलेले नाही. मी गेल्या 6 वर्षांपासून बॉडी बनवण्याचा विचार करत आहे. पण कोणत ना कोणत कारणामुळे मला करायला जमत नव्हते. पण मी तुम्हाला इतकच सांगेन की सध्याच्या परिस्थितीमध्ये सकारात्मक गोष्टी केल्या पाहिजेत असे अनिल कपूरने फोटो शेअर करत म्हटले आहे.