बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (11:47 IST)

अंकिताला व्हायचंय आई

Ankita Lokhande in Bigg Boss 17 विकी जैन आणि अंकिता लोखंडे लग्नानंतर दुसऱ्यांदा रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहेत. यापूर्वी दोघेही स्मार्ट जोडीमध्ये दिसले होते. यावेळी पॉवर कपल म्हणून बिग बॉस 17 मध्ये प्रवेश केलेल्या विकीने घरात प्रवेश करण्यापूर्वी तो शोबद्दल किती उत्सुक आहे हे सांगितले. बिग बॉसबद्दलच्या त्याच्या उत्साहावर विकी म्हणतो, 'बिग बॉसबद्दलच्या माझ्या भावना टप्प्याटप्प्याने बदलत राहतात. जेव्हा शो ला सहमती देली तेव्हा एक्साइटेड होतो आता करारावर स्वाक्षरी झाल्यावर तणाव वाढत आहे.
 
विकीची पहिलीच वेळ असल्याने मी कशी प्रतिक्रिया देईन याची कल्पना नसल्याचे त्याने सांगितले. मात्र घाबरून पळून जाणाऱ्यांमध्ये आम्ही नाही म्हणून आमच्या वाटेवर जे काही येईल त्याला आम्ही धैर्याने सामोरे जाऊ असे त्याने म्हटले.
 
शोमध्ये घरातील सदस्यांशी संवाद साधताना अंकिताने सांगितले की ती तिच्या पतीसोबत बिग बॉसमध्ये का आली आहे. यासोबतच त्यांनी कुटुंब नियोजनाबद्दलही सांगितले. अंकिताने सांगितले की, यावर्षी तिने फक्त तिचा पती विक्कीमुळे बिग बॉस करायला होकार दिला आहे. अभिनेत्री म्हणाली- विकी हा शो फॉलो करतो.
 
फॅमिली प्लानिंगवर इंडिया टूडेसोबत चर्चा करताना अंकिता हसत म्हणाली की या अफवा कुठून येतात माहित नाही. मला कोण काय करत आहे याची काळजी नाही. मात्र बिग बॉसमधून परतल्यावर या अफवा खर्‍या करण्याबद्दल तिने होकार दिली.
 
तिने सांगितले की पुढील वर्षी बेबी प्लान करण्याची शक्यता आहे म्हणून यावर्षी आम्ही शो करत असल्याचं ती म्हणाली.
 
शोमध्ये अनेकदा नाती सुधारताना आणि बिघडताना दिसली आहेत. अशा परिस्थितीत ते किती असुरक्षित आहेत? याला उत्तर देताना विकी म्हणतो, मी अजिबात असुरक्षित किंवा तणावग्रस्त नाही. माझा विश्वास आहे की असे काहीही नाही जे हाताळले जाऊ शकत नाही किंवा सोडवले जाऊ शकत नाही. जेव्हा आम्ही आमचे नाते सुरू केले तेव्हा अनेक गोष्टी घडल्या ज्या आमच्या नियंत्रणात नव्हत्या. तरीही आम्ही त्या सर्व गोष्टींमधून भक्कमपणे बाहेर आलो. तेच करणार.