1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Anushka Sharma warns Virat Kohli to not shave off his beard

विराट तू अजिबात दाढी काढायची नाही, अनुष्काचा आदेश!

क्रिकेट समाचार
मुंबई-विराट कोहली आणि अनुष्का शर्माही जोडी नेहमीच चर्चेत असते. दोघे सोशल मीडियावर एकमेकांविषयी बोलले की ते लगेच व्हायरल होत राहतं.
 
अलीकडेच काही महिन्यांपूर्वी दाढी वाढवण्याचाही क्रिकेटपटूंमध्ये एक ट्रेंड सुरू होता. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू स्टायलिश आणि आकर्षक दाढी ठेवत होते. वेगवान फलंदाज विराट कोहलीलाही या ट्रेंडने भुरळ घातली होती. विराटनेही दाढी वाढवली आणि त्याची दाढी चर्चेचा विषय ठरत गेली. मात्र, आता दाढी काढण्याचा नवाच ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी स्वत:ची दाढी काढली आहे. त्यावेळी विराटने त्यांनाही दाढी काढणार नसल्याचे सांगितले आहे.
 
विराटने इन्स्टाग्रामवर रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना टॅग करत कमेंट लिहिली की, सॉरी बॉस सध्या मी दाढी काढण्यासाठी उत्सूक नाही, पण तुमचा मेकओव्हर चांगला आहे. विराटची ही इन्सटाग्राम पोस्ट वाचताच अनुष्का शर्माने विराट कोहलीला सल्ला किंवा आदेश दिला आहे. विराट तू दाढी अजिबात काढू शकत नाहीस, त्यानंतर विराटने तातडीने ओके असे अनुष्काला उत्तर दिले आहे.
 
या दोघांमध्ये बर्‍याचदा इन्सटाग्रामवरही संभाषण होत असते. विराटच्या फोटाला इन्स्टाग्रामवर जवळपास 8 लाख लाईक्स मिळाले आहेत, तर 9 हजार लोकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत, ज्यामध्ये अनुष्काचाही समावेश आहे.
पुढील लेख
संस्कृती कला दर्पण गौरव पुरस्कार जाहीर