शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (14:43 IST)

Anushka Sharma : दुसऱ्या बाळाच्या स्वागतानंतरअभिनयातून ब्रेक घेणार अनुष्का ?

Anushka Sharma : अनुष्का शर्मा ने रब ने बना दी जोडी या चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. अनुष्का आणि विराट कोहली हे दोघे पावरफुल कपल म्हणून ओळखले  जातात. हे वीरूष्का नावाने ओळखले जातात. अनुष्का आणि विराटला वामिका नावाचे अपत्य आहे. अनुष्काने वामिकाला 2021 मध्ये जन्म दिला. आजवर या दाम्पत्याने आपल्या मुलीचा चेहरा माध्यमांना दाखवला नाही. आता हे जोडपे दुसऱ्यांदा पुन्हा आई बाबा होण्याची चर्चा सुरु आहे. अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या आहे. पापराझी ने नुकतेच त्यांना एका मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर आपल्या केमेर्यात कैद केले. 

सध्या दोघांकडून अनुष्काच्या प्रेग्नेंट असल्यावर काहीही भाष्य आलेले नाही. लवकरच ते या बद्दल खुलासा करण्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीने दिली. दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर अनुष्का कामावरून ब्रेक घेण्याचे वृत्त मिळत आहे. एका व्हिडीओ मुळे ही चर्चा होत आहे. सध्या अनुष्काचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या मध्ये तिने अभिनेत्री सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत लग्न, मुलांच्या बाबतीत काय प्लॅनिंग केलं आहे ते सांगितले. रब ने बना दी जोडी या चित्रपटानंतर सिमी ग्रेवाल ने घेतलेल्या मुलाखतीत तिने लग्ना बद्दल सांगितले की मला लग्न करायचं आहे आणि मुलं देखील हवी आहे.लग्न आणि मुलं झाल्यावर कदाचित मी काम करणार नाही असे ती म्हणाली. 

अनुष्काच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे तर ती चकदा एक्स्प्रेस मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात ती झुलन गोस्वामीच किरदार साकारणार आहे. अनुष्का अभिनयातून ब्रेक घेण्याच्या चर्चेमुळे चाहते निराश झाले आहे. 
 
Edited by - Priya Dixit