शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मी सोनूसोबत आहे : आशा भोसले

मशिदीवरील भोंग्यामुळे झोप मोड होते', असे वादग्रस्त ट्विट करणा-या गायक सोनू निगमच्या समर्थनार्थ सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले मैदानात उतरल्या आहेत.  'मी सोनूसोबत आहे', असे सांगत आशा भोसले यांनी सोनूला पाठिंबा दर्शवला आहे.

युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी नेटवर्कमध्ये बनारसचा 'सिटी ऑफ म्युझिक'मध्ये समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने सुरू असलेल्या संगीत महोत्सवात सादरीकरणासाठी आलेल्या आशा भोसले यांनी बाबा विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेत तेथे विधिवत पूजा केली.  
 
विश्वनाथ मंदिरातील पूजेनंतर मीडियासोबत बोलताना आशाताई म्हणाल्या की, 'सोनू गायकीशी जोडला गेलेला आहे. तो माझा गाणारा मित्र आहे आणि वयोमानानुसार तो माझ्या मुलाप्रमाणे आहे, यामुळे मी सोनूसोबत आहे.'