1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Asha Parekh responds to the controversy over wearing a bold dress

'तुमच्या मुलीने तसले कपडे घातले तर!' अंगप्रदर्शनाबाबतच्या दिग्दर्शकाच्या मागणीवर भडकल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख

सध्या पेड्डी चित्रपटातील जान्हवी कपूरच्या भूमिकेवर वाद सुरु आहे. चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये जान्हवीचे वारंवार क्लोजअप शॉट घेऊन तिला दाखवण्यात आले आहे. या वर वाद सुरु आहे. 
 
या वादावर ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतला एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, एका दिग्दर्शकाने त्यांना बोल्ड ड्रेस घालायला सांगितले तेव्हा त्या संतापल्या आणि त्यांनी रागावून दिग्दर्शका विचारले तुमच्या मुलीने असे कपडे घातले तर. असं म्हटल्यामुळे दिग्दर्शक नि:शब्द झाला. आणि दिग्दर्शकाला आपला निर्णय माघारी घ्यावे लागले. 
 
त्या म्हणाल्या  एका दिग्दर्शकाने मला एका नृत्यप्रसंगासाठी तोकडा पोशाख घालायला सांगितला. मी त्याच्या डोळ्यात थेट बघून विचारलं, "तुमच्या मुलीने हा पोशाख घातला तर तुम्हाला आवडेल का?" मग तो ड्रेस शांतपणे काढण्यात आला.
या वर ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील सांगितले की, त्यांच्यासोबत पण कधी कोणी मर्यादा ओलांडल्या नाही. 
 
आशा पारेख आजच्या अंगप्रदर्शनाबद्दल म्हणाल्या, आजच्या अभिनेत्री एवढ्या सुंदर आहे की त्यांना स्वतःला वस्तू म्हणून प्रेक्षकांसमोर सादर करण्याची काहीही गरज नाही. संजय लीला भन्साळी आपल्या चित्रपटात नायिकांना किती सुंदर आणि कलात्मकतेने सादर करतात. नायिका कोणतीही असो त्या भन्साळींच्या चित्रपटात त्या सुंदर दिसतात.पण इतर दिग्दर्शक त्याच नायिकांचे वेगवेगळ्या पद्धतीने शोषण करतात. 
Edited By - Priya Dixit 
 
About Writer
वेबदुनिया मनोरंजन टीम
वेबदुनिया पोर्टलची मनोरंजन टीम चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कलाकारांच्या आयुष्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स वाचकांना देते. चित्रपटांची परीक्षणे, सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि ग्लॅमर विश्वातील पडद्यामागच्या रंजक बातम्या चवीने मांडण्याचे काम ही टीम करते..... आणखी वाचा
पुढील लेख
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा अपघात,थोडक्यात बचावली