रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (17:18 IST)

औरंगजेबच्या रोलमध्ये आशुतोष राणा

आशुतोष राणा बर्याच काळापासून हिंदी सिनेमापासून दूर आहेत. त्यांच्या स्वाभिमानधील त्यागी अजूनही पब्लिकला आठवत असेल. त्यानंतर कर्ज, पगलत, सोनचिडिया, सिंबा ही आठवत असेल.
 
आता ते लवकरच एक महत्त्वाच्या रोलमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आशुतोष यांनी अनेकवेळा खलनायकाचा रोल केला आहे. आता ते छत्रसाल या वेबसीरिजमध्ये औरंगजेबच्या रोलमध्ये दिसणार आहे. इतिहास आणि पिरीएड ड्रामाने त्यांना नेमहीच आकर्षित केले आहे. छत्रसाल या वेबसीरिजमध्ये बुंदेलखंडातील योद्धा राजे छत्रसाल यांची जीवनगाथा दर्शवण्यात येणार आहे. औरंगजेबचा रोल आपल्यासाठी खरोखर एक आकर्षक रोल होता.
 
एखाद्या महान योध्द्यावरील चित्रपट नेहमीच महान ठरू शकतो. कारण त्या महान योध्द्याने तुल्यबळ महान खलनायक योध्द्याचा मुकाबला केला होता, असे राणा यांनी म्हटले आहे. छत्रसालाने बुंदेलखंडाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन वेचले होते. म्हणूनच हा शो प्रेरणादायी असल्याचेही त्याने म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी हा वेब शो एमएक्स प्लेअरवर लाइव्ह लाँच केला गेला आहे.