गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2017 (12:01 IST)

अभिनेत्री बिदिशा बेजबरूने केली आत्महत्या

assamese singer
नुकताच प्रदर्शित झालेला जग्गा जासूस या सिनेमातील अभिनेत्री बिदिशा बेजबरूने आत्महत्या केली आहे.  सोमवारी तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीबरोबरच बिदिशा गायिकासुद्धा होती. सोमवारी संध्याकाळी गुरूग्रामच्या सुशांत लोक भागात तिचा मृतदेह सापडला. या संपूर्ण घटनेची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. बिदिशा बेजबरूया स्मॉल स्क्रीनवरचा प्रसिद्ध चेहरा होता. तिने अनेक टीव्ही शो होस्टही केले आहेत. बिदिशा काही दिवसांपूर्वीचं मुंबईतून गुरूग्राममध्ये गेली होती. बिदिशाच्या आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.  दरम्यान या प्रकरणी बिदिशाच्या पतीला या घटनेसाठी अटक करण्यात आली आहे. बिदिशा ही मूळची आसामची आहे.