Dharma Sangrah

Bahubali 2: बाहुबली 2 ने 1500 कोटींचा पल्ला गाठला

'बाहुबली 2' चित्रपटाने 1500 कोटींचा पल्ला गाठला आहे. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने शिखरच गाठलं म्हणावं लागेल. चित्रपटाने 1500 कोटींची कमाई केली असून अद्यापही घोडदौड सुरु आहे. हा आकडा नेमका कितीपर्यंत पोहोचणार आहे यावर सगळ्यांची नजर आहे.
बाहुबलीने पहिल्याच दिवशी 121 कोटी आणि जगभरात 217 कोटींची कमाई केली. नंतर 1000 कोटींची कमाई करत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होण्याचा मान आ‍धीच 'बाहुबली 2' ने मिळवला आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळविण्यासाठी प्रेक्षकांनी दोन वर्ष वाट बघितली होती आणि 28 एप्रिलला सिनेमा प्रदर्शित झाल्याबरोबरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सिनेमाने आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.  भारतातच नव्हे तर एकट्या अमेरिकेत 100 कोटींची कमाई करणारा बाहुबली हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरला आहे. तर जगभरात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करण्याचा मानही या चित्रपटाने पटकावला आहे. 

सर्व पहा

दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांची शिक्षा कायम ठेवली

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

धमाल ४: हास्याचा रोलरकोस्टर परत आला आहे

सर्व पहा

अभिनेता रोहित चंदेल याला मुंबई पोलिसांनी पॉक्सो कायद्या अंतर्गत अटक केली

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होणार

ईडीने अभिनेते शेखर सुमन यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांची झडती घेतली

माणिकुट पर्वतरांगांवर एक शांत ठिकाण झिलमिल गुहा, जिथे सप्त ऋषींनी केली होती तपश्चर्या

फराह खानने 'लॉक अप' 'बिग बॉस' पेक्षा अधिक कठीण म्हणत केले मोठे विधान

पुढील लेख
Show comments