1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Baahubali 2 makes history; crosses Rs 1,000 crore at box-office

बाहुबली 2: एक हजार कोटींची ऐतिहासिक कमाई

देशात 800 कोटी तर परदेशांत 200 कोटी रूपये अशी बाहुबली 2 ची घसघशीत कमाई आहे. ज्या पद्धतीने या चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. बाहुबली 2 सर्व विक्रम मोडून इतिहास रचत आहे. या चित्रपटाने जगभरातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये मिळून एक हजार कोटी रूपयांची कमाई केली आहे. 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार हा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे.
 
दरम्यान, बाहुबली साकारणारा अभिनेता प्रभासने आपल्या फेसबुक पेजवरून बाहुबली 2 च्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौळी यांचेही प्रभासने त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत.
 
यापूर्वी आमिर खानच्या पीके चित्रपटाने जगभरात 768 कोटी रूपयांची तर दंगल चित्रपटाने 718 कोटी रूपयांची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटांना बाहुबली 2 ने मागे टाले आहे.
पुढील लेख
आता प्रेमचं उरले नाही!