Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (10:04 IST)
बाहुबली 2चा सीन झाला लीक.... व्हिडिओ एडिटरला अटक (व्हिडिओ)
बाहुबलीचा दुसरा भाग 'बाहुबली: द कनक्लूज़न' नावाने तयार करण्यात येत आहे. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे आणि वीएफएक्स तथा विज्युअल इफेक्ट्सचे काम सुरू आहे. चित्रपटाला भारी सुरक्षेत शूट करण्यात आले असले तरी या चित्रपटाचा एक महत्त्वपूर्ण क्लिप लीक होऊन सोशल मीडियेवर वायरल झाला आहे.
या व्हिडिओ क्लिपला यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आले ज्यात प्रभाष आणि अनुष्का शेट्टी एका वार सीक्वेंसची शूटिंग करत आहे. या क्लिपला लगेचच काढण्यात आले आहे, पण तोपर्यंत हे वायरल होऊन चुकले होते.
ही बाब जेव्हा बाहुबलीच्या टीमला कळली, चित्रपटाच्या निर्मात्यांनी हैदराबाद स्थित जुबिली हिल्स पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच कारवाई करत ग्राफिक्स युनिटच्या एका व्हिडिओ एडिटराला अटक केली आहे.