रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मार्च 2017 (09:11 IST)

‘बाहुबली 2’चं आणखी एक पोस्टर रिलीज!

दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांचा आगामी सिनेमा ‘बाहुबली : दी कन्क्लुजन’चं आणखी एक नवे पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये कटप्पाने बाहुबलीला त्याच्या हातामध्ये घेतलेलं दिसत आहे, तर दुसरीकडे बाहुबली कटप्पाला मारताना दिसत आहे.
 
‘ज्या मुलाला त्याने वाढवलं, त्याच मुलाला त्याने मारलं,’या कॅप्शनसह राजामौली यांनी पोस्टर शेअर केलं आहे. आमच्या डिझायनरला ही आयडिया सुचली आणि ट्वीट करण्याचा मोह आवरला नाही, असंही राजामौली यांनी म्हटलं आहे.
 
तर कारण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्रेलर १६ मार्चला रिलीज होणार असल्याचे स्पष्ट केले.