Biodata Maker marathi
✕

आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त होते महाभारतमधील भीम

Updated: मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (10:31 IST)
 
खेळाडू म्हणून कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर प्रवीण कुमार सोबती बॉलिवूडकडे वळले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या, पण बीआर चोप्राच्या 'महाभारत'ने त्यांना सर्वाधिक ओळख दिली. ज्यात त्याने भीमाची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेने त्यांना घरोघरी प्रसिद्धी दिली. प्रवीण कुमार सोबती यांना त्यांच्या मजबूत शरीरामुळे भीमाच्या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली होती.
 
प्रवीण कुमार सोबती यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अमिताभ बच्चन, जितेंद्र यांसारख्या सुपरस्टार्ससोबतही काम केले आहे. त्यांनी 1981 मध्ये 'रक्षा' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या वर्षी आलेल्या 'मेरी आवाज सुनो'मध्ये प्रवीण कुमार सोबतीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटांमध्ये त्यांनी जितेंद्रसोबत काम केले. अमिताभ बच्चन यांच्या 'शहेनशाह' या सुपरहिट चित्रपटातही ते दिसले होते. याशिवाय चाचा चौधरी या मालिकेत ते साबूच्या भूमिकेत दिसले होते.
 
50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते प्रवीण यांच्या शेवटचा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव होते 'महाभारत और बर्बर'. प्रवीणकुमार सोबती यांनी येथे भीमाची भूमिका साकारली होती. यानंतर अभिनय सोडून प्रवीण कुमार सोबती यांनी राजकारणात प्रवेश केला, त्यांनी आम आदमी पार्टीच्या तिकिटावर दिल्लीतील वजीरपूरमधून निवडणूक लढवली. पण जिंकता आले नाही. काही काळानंतर त्यांनी आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
 
काही काळापूर्वी प्रवीण कुमार यांनी उदरनिर्वाहासाठी पेन्शनची विनंती केली होती. आपल्या आर्थिक संकटाची माहिती देत ​​त्यांनी सरकारकडे मदतीचीही मागणी केली होती.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

“बुलेटप्रूफ काचेतही वाचणार नाही...”; अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लनची उघड धमकी!

पुढील लेख
Show comments