रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 16 मार्च 2024 (12:53 IST)

सुशांतच्या मृत्यूबाबत मोठे खुलासे

sushansing
सुशांत सिंहच्या बहिणीने मोठे दावे केले आहेत. अमेरिकेत स्थायिक असलेली सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्ती हिनं सुशांतच्या निधनाबद्दल दावे केल्याचे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मृत्यूचा तपास करणारी सीबीआय यंत्रणा या प्रकरणात मोठे खुलासे करणार असल्याचं श्वेता सिंग किर्तीनं दावा केला आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण गेली तीन वर्ष जे प्रकरण चर्चेत होत पण परत आता चर्चेत आले आहे. सुशांतच्या बहिणीनं PM नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की, सुशांतच्या मृत्यूचा तपास योग्य दिशेनं व्हावा. 
 
सुशांतसिंह राजपूत या प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाला आता तीन वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे केले गेले होते. तसेच आरोप-प्रत्यारोप अनेकांकडून झाले. अनेकांवर संशय देखील घेण्यात आला. व याप्रकरणात समोर आलेल्या ड्रग अँगलने तर संपूर्ण बॉलिवूड हादरुन गेलं होतं. अनेक मोठे गौप्यस्फोट १४ जून २०२० रोजी घडलेल्या या घटनेबाबत आतापर्यंत  करण्यात आले होते. तसेच अभिनेता सुशांत सिंगच्या बहिणीने यासंदर्भात मोठे दावे केले आहे. यासंदर्भात तिने सांगितले की आणि विनंती केली की, तप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआय करत असलेल्या तपासात लक्ष घालावं. अद्यापही या प्रकरणाचा तपास नेमका सुरू आहे. माझ्या भावाच्या निधनाला आता ४५ महिने झालेत. काय घडले याबाबत काहीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही अस कीर्ति म्हणाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी विनंती करते की, त्यांनी या तपासात  लक्ष्य घालावे. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत,एक कुटूंब म्हणून आम्ही लढतोय. सुशांत सिंगचे चाहते तसंच कुटूंबिय म्हणत आहेत की, सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. आता पर्यन्त सुशांतच्या मृत्यूचा तपास हा हत्या की आत्महत्या यात अडकला आहे. तसेच आत्महत्या वाटावी असं भासवण्याचा प्रयत्न केला गेला, असल्याचंही म्हणणं आहे. अभिनेता सुशांत सिंहची बहिण तसेच जवळचे मित्र व चाहते देखील सुशांतला न्याय मिळावा म्हणून प्रतीक्षेत आहे.

Edited By- Dhanashri Naik