शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (14:42 IST)

Bigg Boss 15: रश्मी देसाई बिग बॉस च्या शोमधून बाहेर

अखेर तो दिवस आला आहे ज्याची 'बिग बॉस'चा प्रत्येक फॅन वाट पाहत आहे. शोचा ग्रँड फिनाले शनिवार आणि रविवारी आहे, हा फिनाले सलमान खान होस्ट करणार आहे . यासह, टीव्हीच्या सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या सीझन 15 च्या विजेत्याची घोषणा केली जाईल. सध्या 6 जणांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. हा शो आज रात्री प्रसारित होईल पण त्याआधी रश्मी देसाईला बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सेटवरून तिचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती सलमान खानसोबत उभी आहे.
 
वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या स्पर्धकांमध्ये फक्त रश्मी देसाई एकमेव स्पर्धक होती. स्पर्धक राखी सावंत, रितेश, त्याच्यासोबत आलेली देवोलिना भट्टाचार्जी आणि वाइल्ड कार्ड घेऊन शोमध्ये आलेला अभिजीत बिचकुले याआधीही बाहेर पडले आहेत. बिग बॉसच्या फॅन पेजवरून इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर रश्मी या शो मधून बाहेर पडल्यामुळे रश्मीच्या चाहत्यांची नक्कीच निराशा होईल. 
 
 या शो च्या ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसचे माजी स्पर्धक गौहर खान, श्वेता तिवारी, रुबिना दिलैक, राखी सावंत, उर्वशी रौतेला आणि गौतम गुलाटी दिसणार आहेत. या व्यतिरिक्त, या सीझनचे स्पर्धक माईशा अय्यर, इशान सहगल आणि डोनल बिष्ट देखील शोमध्ये हजेरी लावणार आहेत