मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (15:14 IST)

रणबीर कपूर आणि आलिया भट्टला लग्नात मिळाल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू;

ranbir alia
बॉलीवूड मधील काही प्रसिद्ध कलाकारांचे जीवन म्हणजे जणू काही राजपुत्र आणि राजकुमारी सारखे असते असे म्हटले जाते. त्यांच्या लग्न समारंभाची ही मोठी चर्चा होते. या समारंभाला मोठमोठे सेलिब्रिटी उपस्थिती लावतात आणि भेटवस्तूंचा वर्षाव करतात सध्या देखील एका जोडप्यावर असाच भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे.
 
बॉलिवूडचा रॉकस्टार म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरने १४ एप्रिललाच अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केले. रणबीरच्या वास्तू अपार्टमेंटमध्येच लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले आणि या खास प्रसंगी या जोडप्याचे संपूर्ण कुटुंब आणि काही खास मित्र उपस्थित होते.विशेष म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या आनंदात सामील होण्यासाठी करिश्मा कपूर, अयान मुखर्जी, करण जोहर, करीना कपूर खान यांच्यासह अनेक स्टार्स एका छताखाली जमले होते. शनिवारी रात्रीच या प्रसिद्ध जोडप्याने आपल्या खास मित्रांसाठी पार्टी आयोजित केली होती. दरम्यान, त्यांना लग्नात मिळालेल्या आकर्षक आणि महागड्या भेटवस्तूंचे बॉक्स उघडण्यात आले आहेत.
 
खास गोष्ट म्हणजे करीना कपूर खानने तिच्या भावाच्या वधूला 3.1 लाख रुपये किमतीचा डायमंड सेट भेट दिला आहे. रणबीर कपूरला अनेक वर्षे डेट करणाऱ्या दीपिका पदुकोणनेही या जोडप्याला म्हणजे रणबीर-आलियाला सुमारे 15 लाखांचे घड्याळ गिफ्ट केले आहे. दुसरीकडे, रणवीर सिंगने लग्नाची भेट म्हणून (Kawasaki Ninja H2 R ही बाईक भेट दिली आहे.  तसेच कतरिना कैफने आलिया भट्टला तिच्या लग्नात 14.5 लाख रुपयांचे सुंदर प्लॅटिनम ब्रेसलेट भेट दिले आहे. रणबीर कपूरसोबत काम केलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आलियाला मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला सुंदर ड्रेस दिला असून त्याची किंमत 1.6 लाख आहे.
 
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नानंतर त्यांना भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. खास मित्रांकडून रोज नवनवीन भेटवस्तू या जोडप्याच्या घरी येत आहेत. सिद्धार्थ मल्होत्राने या जोडप्याला वर्सेस हँडबॅग दिली आहे, ज्याची किंमत सुमारे तीन लाख आहे. तर दुसरीकडे वरुण धवनने त्याची खास मैत्रिण आलिया भट्टला हाय हिल्स सँडल गिफ्ट केले आहे, ज्याची किंमत 4 लाख असल्याचे बोलले जात आहे.
 
अर्जुन कपूरने त्याचा जवळचा मित्र रणबीर कपूरला दीड लाख रुपयांचे जिपर जॅकेट भेट दिले आहे. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही सातासमुद्रापार भेटवस्तू पाठवली आहे. प्रियांका चोप्राने आलियाला 9 लाख रुपये किमतीचा हिऱ्याचा हार भेट दिला आहे. आलिया आणि रणबीरचा जवळचा मित्र अयान मुखर्जीने या जोडप्याला ऑडी Q8 दिली आहे. विशेष म्हणजे अयान मुखर्जी या जोडप्याच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचाही दिग्दर्शक आहे.