बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2017 (12:01 IST)

दीपिकाने केली गंगाआरती

अभिनेत्री दीपिका पादुकोणने ऋषिकेशच्या घाटावर गंगाआरती केली. यावेळी दीपिकाचे कुटुंबियही उपस्थित होते. पांढरा कुर्ता आणि शाल परिधान केलेल्या दिपिकानं गंगाघाटावर पूजा केली. तिने सहकुटुंब भगवान शंकराचं दर्शन घेऊन, संध्याकाळच्या गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला. परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती महाराज आणि साध्वी भगवती यांच्यासोबत तिने धार्मिक पद्धतीनं गंगापूजन केलं. गंगापूजनाच्या कार्यक्रमानंतर दीपिकानं गंगा नदी आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहनही उपस्थीतांना केलं.