शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मे 2022 (23:05 IST)

Bollywood: शाहरुख खान-काजोलची जोडी पुन्हा दिसणार मोठ्या पडद्यावर, या चित्रपटात एकत्र काम करणार

बॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध ऑनस्क्रीन जोडपे शाहरुख खान आणि काजोल लवकरच पुन्हा एकदा स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत. हे दोन्ही कलाकार करण जोहरच्या आगामी चित्रपटात दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करणच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात शाहरुख आणि काजोल पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत. करणच्या या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत.
 
रिपोर्टनुसार, चित्रपटात दोघांचे खास गाणे असेल की सीन असेल हे अद्याप ठरलेले नाही. अलीकडेच करणने रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबतच्या चित्रपटाची रिलीज डेट उघड केली होती. हा चित्रपट पुढील वर्षी 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असल्याचे करणने सांगितले होते.
 
काजोल आणि शाहरुख शेवटचे 2015 मध्ये आलेल्या दिलवाले चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला होता. कमकुवत कथेमुळे हा चित्रपट लोकांना आवडला नाही.