गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 मे 2022 (09:37 IST)

Boney Kapoor Fraud Case:निर्माता बोनी कपूर झाले सायबर फ्रॉडचे शिकार, बँक खात्यातून मोठी रक्कम चोरी

प्रसिद्ध निर्माता आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांच्यासोबत सायबर फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोनी कपूर यांच्या बँक खात्यातून सुमारे तीन लाख 82 हजार रुपये चोरीला गेले आहेत. याप्रकरणी निर्मात्याने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुंबईतील आंबोली पोलिसांनी बुधवारी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बोनी कपूर यांना मार्च महिन्यात समजले की त्यांच्या खात्यातून कोणीतरी पैसे काढले आहेत. बँकेकडून त्यांना याबाबत माहिती मिळाली असता, त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बोनी कपूर यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती कोणालाही दिली नाही किंवा त्यांना या फसवणुकीशी संबंधित कोणताही फोन कॉल आला नाही. अशा परिस्थितीत आता बोनी कपूर यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे. बोनी कपूर यांच्या खात्यातील पैसे गुरुग्राममधील एका कंपनीच्या खात्यात गेल्याचा दावा केला जात आहे. 
 
बोनी कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चित्रपट निर्माता आहेत. 'मिस्टर इंडिया', 'नो एंट्री, जुदाई', 'वॉन्टेड' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे ते निर्माते आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.