शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (13:05 IST)

'चिट्टी' निघाला चीनला

मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत 400 कोटींची कमाई केली आहे. तर केवळ एका आठवड्याच्या आत हिंदी भाषेतून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने 112 कोटींची कमाई केली आहे. आता चीनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. तो चीनच्या चित्रपटगृहात पुढील काही महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चीनच्या 10हजार चित्रपटगृहात तो साधारण मे 2019 मध्ये दाखवण्यात येणार आहे. 2.0 साठी तब्बल 56 हजार स्क्रीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तो यातील 47 हजार स्क्रीनवर 3D मध्ये तो पाहता येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या परदेशी चित्रपटाला 3D साठी स्क्रीन उपलब्ध करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे.