बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (11:02 IST)

कपिल शर्माच्या घरी चिमुकल्याचं आगमन

कॉमेडियन कपिल शर्माने पुन्हा एकदा गुड न्यूज दिली आहे. कपिल शर्माच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. कपिल शर्माची पत्नी गिन्नीने मुलाला जन्म दिला आहे. कपिल शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी शेअर केली आहे. बाळ आणि आई दोघंही सुखरुप असल्याचं कपिलने ट्विटमध्ये सांगितलं आहे.
 
पहाटे ५.३० वाजता कपिल शर्माने ट्विट करत ही गोड माहिती दिली , “नमस्कार, आज सकाळी आम्हाला देवाच्या आशीर्वादाच्या रुपात मुलगा आला आहे. ईश्वराच्या कृपेने बाळ आणि आई दोघंही चांगले आहेत. तुमचं प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभार. गिन्नी आणि कपिल”.
 
कपिल शर्माच्या ट्विटनंतर त्याच्यावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कपिल शर्माची मुलगी एक वर्षांची असून आता कुटुंबात नवा पाहुणा आला आहे.