1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Complaint filed against Sonu Nigam

वादग्रस्त वक्तव्यामुळे सोनू निगमवर खटला दाखल

गायक सोनू निगम यानी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर लष्कर न्यायालयात खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्यावरील पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.पी.पुजारी यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे.अन्वर हुसेन बुडन शेख यांनी ऍड. वाजेद खान (बीडकर) यांच्यामार्फत न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम 153 अ (समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे) आणि 295 अ (धार्मिक भावना दुखावणे) नुसार हा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यावर पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.
पुढील लेख
'महाभारत' या चित्रपटाची घोषणा होताच त्यावर वाद...