शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2020 (09:04 IST)

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना

दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट येताच त्या दोघांनी घराच्या बिल्डींगमधील वेगळ्या भागात ठेवण्यात आलं आहे. करण जोहरने याबाबत बीएमसीला माहिती देताच संपूर्ण बिल्डिंग सॅनिटाइज केली आहे. सोबतच सगळ्यांना सक्तीचं होम क्वारंटाईन राहण्यास सांगितलं आहे. करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, घरातील नोकरांना कोरोनाची लागण झाली असून आम्ही संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन झाल्याचे सांगितले आहे.

तसेच यासंदर्भात बीएमसी माहिती दिल्यानंतर संपूर्ण बिल्डिंगमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. आता, पुढील १४ दिवसांसाठी आम्ही स्वत: अलगीकरण करुन घेतल्याचेही करणने सांगितले. तसेच, घरात काम करणाऱ्या इतर नोकरांचे आणि सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याचेही करणने सांगतिले आहे. करणने, एक पत्रक प्रकाशित करत यासंदर्भात माहिती दिली.