1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (15:24 IST)

“बेलोसा” लघुचित्रपटाला “दादासाहेब फाळके पुरस्कार

Belosa
जिल्ह्याच्या मोहदा येथील पवन भुते या तरुणाने पटकथा आणि सहदिग्दर्शित केलेला “बेलोसा” या आदिवासी जमातीतील कातकरी समाज जिवनावरिल  लघुचित्रपटाला चित्रपट सृष्टीचा “दादासाहेब फाळके” हा अव्वल पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले.
 
“हिस्सा ” नावाचा लघुचित्रपट 2016 मध्ये याआधी पवन भुते यांनी निर्मित केला होता. ज्याचे गाव, तालुका तथा जिल्हास्तरावर कौतुक ही झाले होते. पण त्यांच्या स्वप्नाची वाटचाल त्यांना स्वस्थ बसू देणारी नव्हती, अशातच सोलापूर येथील मनोज भांगे या स्वप्न सहप्रवासाची सोबत त्यांना मिळाली आणि “बेलोसा” लघुचित्रपटाचे स्वप्न उदयास आले. राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय 25 पुरस्कारां सोबतच अत्यंत मानाचा समजला जाणारा “दादासाहेब फाळके” पुरस्कार ही त्याला मिळाल्यामुळे गाव खेड्यातील कल्पकता आणि गुणवत्तेवर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे.यानिमित्ताने त्यांच्या घरी, गावात आणि त्यांच्या मित्रमंडळात अभिमानपुर्ण उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.