1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (15:30 IST)

Deepika Padukone Viral Video:दीपिकाच्या जस्ट लुकिंग वॉव व्हिडिओने मोडलं रेकॉर्ड

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नुकतेच कॉफी विथ करणमध्ये दिसले, पण यादरम्यान दीपिका असे काही बोलली ज्यामुळे ती खूप ट्रोल झाली. 
 
या सर्व वादांदरम्यान, दीपिकाने एक अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती 'जस्ट लुकिंग...' म्हणताना दिसत आहे आणि तो इतका वेळा पाहिला गेला आहे की त्याने सलमान खानच्या 'टायगर 3' च्या ट्रेलरच्या व्युज रेकॉर्ड देखील मोडला आहे. 
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने व्हायरल ट्रेंडवर 'जस्ट लुकिंग वॉव...' अशी रील बनवली होती. या रीलवर दीपिकाच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की आता हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे. दीपिकाच्या या रीलवर तिचे चाहते कमेंट करत आहेत आणि अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
 
दीपिका पदुकोणच्या या व्हिडिओला आतापर्यंत 191 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच दीपिकाचा हा व्हिडिओ आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे.







Edited by - Priya Dixit