शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2016 (14:52 IST)

Dhamaka: शाहरुखसोबत काम करणार आहे ऐश्वर्या!

नुकतेच ऐश्वर्या राय बच्चनचे 'जज्बा' आणि 'सरबजीत' रिलीज झाली आहे. दिवाळीच्या वेळेस 'ऐ दिल है मुश्कील'मध्ये ती दिसणार आहे. वृत्त असे आहे की ऐश्वर्या रायला एक फिल्म ऑफर झाली आहे ज्यात ती शाहरुख खानच्या अपोजिट दिसणार आहे. शाहरुख इच्छा ऐश्वर्यासोबत दुसर्‍यांदा चित्रपट करायची आहे आणि ती इच्छा आता पूर्ण होणार आहे असे दिसून येत आहे.  
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाला इम्तियाज अली बनवत आहे. शाहरुख आणि अनुष्का शर्मा यांना साइन करण्यात आले आहे. चित्रपटात तिचा एक छोटा पण महत्त्वपूर्ण रोल आहे. इम्तियाज यांना एखाद्या मॅच्योर हिरॉईनला घ्यायचे होते. शाहरुखने त्यांना ऐश्वर्या रायचे नाव सुचवले आणि इम्तियाजला हे पसंत पडले. ऐश्वर्या ने अद्याप होकार दिला नाही पण तिला ऑफर देण्यात आले आहे.