1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (19:01 IST)

दीया और बाती हम' फेम अभिनेत्री 'कनिका माहेश्वरी' पतीपासून 11वर्षा नंतर विभक्त होणार

Kanika Maheshwari
Instagram
दिया और बाती हम' या टीव्ही मालिकेतील मीनाक्षी विक्रम राठी फेम कनिका माहेश्वरी आठवत असेल. तिने शोमधील आपल्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आणि अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली. मात्र अलीकडे कनिका माहेश्वरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कनिका माहेश्वरीने पती अंकुरला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार आहेत.
 
दीया और बाती हम' मधील मीनाक्षी भाभीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या कनिकाने 2012 मध्ये तिच्या कॉलेज प्रेमी अंकुर घईशी लग्न केले. मात्र, दोघे काही काळापूर्वी वेगळे झाले आणि तीन महिन्यांपूर्वी त्यांनी घटस्फोटाची केस दाखल केली. पुढील वर्षी कनिका आणि अंकुर यांचा घटस्फोट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
 
रिपोर्ट्सनुसार, कनिका जवळपास 4 वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत आहे. कनिका आणि तिचा 8 वर्षांचा मुलगा नानक मुंबईत तर अंकुर दिल्लीत राहत असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांनीही हे लग्न वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे, मात्र त्यांना यश आले नाही. मात्र, याबाबत अद्याप दोन्ही बाजूंनी कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
 
कनिका आणि अंकुर 2013 मध्ये सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए' (सीझन 6) मध्ये एकत्र दिसले होते. यासोबतच या दोघांनी काही शॉर्ट फिल्म्सही बनवल्या आहेत आणि काही वेब सीरिजही केल्या आहेत. कनिका 'दिल दियां गलां'मध्ये शेवटची दिसली होती आणि तिने अद्याप या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 

Edited by - Priya Dixit