suvichar
✕

Dunki Teaser: 'डंकी'चा टीझर या खास दिवशी रिलीज होणार

Updated: मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (07:16 IST)
 
शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाचा टीझर एका खास दिवशी रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, 'डंकी'चा टीझर शाहरुख खानच्या वाढदिवसाला 2 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. यासोबतच शाहरुख खान वाढदिवसाच्या खास कार्यक्रमात चाहत्यांसह त्याच्या चित्रपटाचा टीझर लाईव्ह पाहणार असल्याची बातमी आहे.
 
'डंकी' चा टीझर 2 नोव्हेंबर 2023 रोजी डिजिटल जगात रिलीज होणार आहे. एवढेच नाही तर शाहरुख खान मुंबईत त्याच्या चाहत्यांसाठी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करणार आहे आणि त्याच्या खास दिवशी त्याच्या चाहत्यांसह टीझर पाहणार आहे. राजकुमार हिरानी यांनी गेल्या काही वर्षांत निर्माण केलेल्या जगाची ओळख हा टीझर प्रेक्षकांना करून देणार आहे. हा सर्वांसाठी खास चित्रपट असून त्याची प्रमोशनल कॅम्पेनही खास असणार आहे. 'डंकी'मध्ये शाहरुखचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार असून या ख्रिसमसचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक सज्ज झाले आहेत.
 
टीझरचे दोन व्हर्जन तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, कोणती आवृत्ती फायनल झाली आहे हे स्पष्ट झालेले नाही. टीझरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून यू प्रमाणपत्र मिळाले आहे. 'डंकी' ची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंटने राजकुमार हिरानी फिल्म्स आणि जिओ स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नूही मुख्य भूमिकेत आहे.





Edited by - Priya Dixit    
 
 
 

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

विमल जाहिरात वादासंदर्भात अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली; तुकाराम मुंडे म्हणाले....

दिवाळीत कोकण फिरायचे आहे? गणपतीपुळे, रत्नागिरी आणि आसपासच्या ठिकाणांचा ट्रॅव्हल प्लॅन

'इठा'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला, श्रद्धा कपूर लावणी कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

ज्येष्ठ अभिनेते पॅट्रिक स्टीवर्ट यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments