1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 एप्रिल 2025 (10:29 IST)

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सुपरस्टार महेश बाबूला नोटीस पाठवली

Mahesh Babu Gets ED Summon In Money Laundering Case
दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू यांना ईडीने नोटीस पाठवून २७ एप्रिल रोजी हैदराबादला बोलावले आहे. त्यांनी अभिनेत्याला हैदराबाद ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. हे संपूर्ण प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे. त्याचे चाहतेही नाराज झाले आहेत. 
काय आहे प्रकरण 
मिळालेल्या माहितीनुसार, रिअल इस्टेट गुंतवणूकदारांच्या कथित फसवणुकीच्या मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अनेक ठिकाणी छापे टाकले. सुराणा ग्रुप आणि साई सूर्या डेव्हलपर्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. सिकंदराबाद, जुबली हिल्स आणि बोवेनपल्ली येथील ठिकाणी छापे टाकण्यात आले. महेश बाबू या कंपनीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होते.
त्यांच्यावर अद्याप कोणतेही आरोप नाहीत. यामुळेच हैदराबादच्या रिअल इस्टेट फर्म साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेता महेश बाबू यांनाही समन्स बजावण्यात आले आहे आणि 27 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit