मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (14:14 IST)

पूनम पांडेसोबत चाहत्याची असभ्य वर्तणूक, किस करण्याचा प्रयत्न केला

Poonam pandey
अभिनेत्री पूनम पांडे ही नेहमी चर्चेत असते. कधी स्वतःच्या निधनाची खोटी बातमी देण्यावरून ट्रोल होते. आता तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चाहता सेल्फी घेण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ येऊन तिला किस करण्याचा प्रयत्न करत आहे. पूनम पांडेच्या या व्हिडिओवर नेटकरी संतापले आहे. तिला ट्रोल करत आहे. लोकांचे म्हणणे आहे. की हा व्हिडीओ पट्कथाबद्ध आहे. 
व्हिडीओ मध्ये पूनम पांडे उभी आहे एक चाहता तिच्या जवळ येतो आणि सेल्फी घेण्याचे म्हणतो. आणि तिच्या गालावर किस घेण्याचा प्रयत्न करतो. ती घाबरून त्याला मागे ढकलते. आणि तिथे उभे असलेले लोक परिस्थिती हाताळतात आणि त्या चाहत्याला मागे ढकलतात.
पूनम नेहमी आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात असते. पब्लिसिटीसाठी पूनम काहीही करते. असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या सर्व प्रकरणावर नेटकरी आपापली प्रतिक्रिया देत आहे. 
Edited By - Priya Dixit