1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Golmaal 4

'गोलमाल फोर' मध्ये परिणीती झळकणार

रोहित शेट्टी गोलमाल फोर परिणिती चोप्रा
रोहित शेट्टीच्या गोलमाल फोर मध्ये मुख्य अभिनेत्री कोण असणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून यात परिणिती चोप्रा प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हा चित्रपट २०१७ च्या दिवाळीत रिलीज होणार आहे. यापूर्वीचे गोलमाल, गोलमाल रिर्टर्न चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावले आहेत. त्या मालिकेतील हा चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीसाठी श्रद्धा कपूर, आलिया भट्ट व दीपिका पदुकोण यांचीही नांवे चर्चिली जात होती.
गोलमाल फोरमध्ये अजय देवगणसोबत संजय दत्तही दिसणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या असून त्याबाबत अजून तरी कोणतेही स्पष्टीकरण रोहित शेट्टी यांच्याकडून दिले गेलेले नाही. अजय देवगणने मात्र परिणीते स्वागत करत म्हटले की क्रेजी फॅमेली तुझे स्वागत आहे.
पुढील लेख
नोटबंदीच्या निणर्यावर सनी लिओनीचे ट्वीट