सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (09:22 IST)

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर, अभिनेत्याला विशेष सन्मान मिळणार

प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता शाहरुख खानला सौदी अरेबियातील रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीत मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजकांनी एका निवेदनात म्हटले आहे की, शाहरुख खानचा चित्रपट जगतातील असाधारण योगदानाबद्दल सन्मान करण्यात येत आहे. जेद्दाह येथे लाल समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर 1 डिसेंबर रोजी उद्घाटन समारंभात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. खान म्हणाले की, रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा पुरस्कार मिळाल्याने मी खरोखरच सन्मानित आहे.
 
सौदी अरेबियातील माझ्या चाहत्यांमध्ये येण्यास उत्सुक आहे. वृत्तानुसार, तो सध्या सौदी अरेबियामध्ये त्याच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत आहे. फिल्मोत्सवाचे सीईओ मोहम्मद अल तुर्की यांनी शाहरुख खानला एक विलक्षण प्रतिभा आणि जागतिक सुपरस्टार म्हणून वर्णन केले. 10 डिसेंबर रोजी 61 देशांतील 41 भाषांमधील 131 फीचर फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्स दाखवून चित्रपट महोत्सवाचा समारोप होणार आहे.
 
Edited by - Priya Dixit