रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2017 (13:58 IST)

आमिरने कापला केक, सत्यमेव जयतेबद्दल केला खुलासा!

14 मार्च रोजी हिंदी चित्रपट इंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा वाढदिवस आहे. या प्रसंगी तो मिडियासमोर आला. आमिर म्हणाला 'माझी आई प्रत्येक वर्षी एकसारखेच गिफ्ट देते. मला सीक कबाब फार आवडतात, तर प्रत्येक वर्षी ती माझ्यासाठी तेच बनवते, यावर्षी देखील बनवले आहे.  
 
सत्यमेव जयतेची माझी संपूर्ण टीम महाराष्ट्रात पाण्याच्या संदर्भात काम करत आहे. या कामाला आम्ही 24 तास देतो म्हणून आम्ही टीव्हीवर सत्यमेव जयते शो नाही आणू शकत आहोत.  
 
आमिरने म्हटले, 'फिल्म 'दंगल'ची लोकांनी फार प्रशंसा केली ही आमच्यासाठी फारच मोठी बाब आहे. पुढे आमिर म्हणाला, 'मी सध्या 'ठग' चित्रपट करत आहो. जूनमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होईल.' या चित्रपटात मला अमितजींसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने मला फारच आनंद होत आहे.  
 
आमिर नेहमी आपल्या वाढदिवसानिमित्त मीडिया समोर येतो. आमिरने त्याचा बर्थडे केक मीडियासमोर कापला.