माझे चित्रपट चालले नाहीत, तर मीच जबाबदार - अक्षय कुमार
"जर माझे चित्रपट चांगले चालत नसतील, तर त्याला मीच जबाबदार आहे. प्रेक्षकांना काय हवं आहे, हे मला समजून घ्यावं लागेल, असं वक्तव्य अभिनेता अक्षय कुमारने केलं आहे.
'कटपुतली' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अक्षय कुमार बोलत होता. नुकतेच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारचे लागोपाठ तीन चित्रपट रिलीज झाले. हे तिन्ही चित्रपट फ्लॉप झाल्याचं निदर्शनास आलं होतं.
आता अक्षयचा पुढचा चित्रपट 'कटपुतली' थेट OTT वर प्रदर्शित होणार आहे.
यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अक्षय म्हणाला, "चित्रपट चालले नाहीत, तर ती माझी चूक आहे. मला माझी विचारसरणी आणि मार्ग बदलावे लागतील. मी कोणत्या प्रकारच्या चित्रपटात काम करावे, याचा विचार करावा लागेल. अशा परिस्थितीत दुसऱ्या जबाबदार धरणे चुकीचे आहे आणि ही सर्व जबाबदारी माझी आहे."