Daily Horoscope
✕

अजूनही काजोल माझी जवळची मैत्रिण -करण जोहर

Updated: गुरूवार, 31 ऑगस्ट 2017 (12:41 IST)
करणने काजोलच्या बर्थ डे पार्टीत जाऊन जुन्या मैत्रिणीसोबतचे रुसवे-फुगवे दूर केले. तर काजोलनेही करणच्या मुलांचा पहिला फोटो लाईक करुन त्यांच्यातील कटुता दूर झाल्याचे जाहीर केले. यादरम्यान आणखी एक बातमी आहे की, शाहरुख खानच्या ‘टेड टॉक्स’ शोमध्ये पाहुणा म्हणून आलेल्या करण जोहरने काजोलला एक खास पत्र लिहिले. ज्यात त्याने आत्मकथेत काजोलसाठी लिहिलेल्या कठोर शब्दांवर खेद व्यक्त केला. ‘टेड टॉक्स’ या एपिसोडची थीम ‘चेंजिंग रिलेशनशिप’ होती, ज्यात सेलिब्रिटी पाहुण्याला बोलून किंवा लिहून आपल्या भावना जाहीर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यावेळी करण जोहरने काजोलच्या नावाने पत्र लिहिले. या पत्रात असं लिहिलं होतं की, “काजोल अजूनही माझी जवळची मैत्रिण असून 25 वर्षांची ही मैत्री अतिशय खास आहे.” करणने या पत्राद्वारे त्याच्या आत्मकथेत काजोलसाठी लिहिलेले कठोर शब्दांची तीव्रता कमी करण्याचाही प्रयत्न केला.
 
“काजोलसोबत आता माझं कोणतंही नातं नाही. आमच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. असं काहीतरी घडलं ज्यामुळे मी फारच निराश झालो. मात्र त्याचा खुलासा मला करायचा नाही. कारण मला वाटतं की हे आमच्यासाठी योग्य ठरणार नाही. 25 वर्षांनंतर आता काजोल आणि मी बोलत नाही,” असं करणने त्याच्या पुस्तकात स्पष्ट लिहिलं आहे.

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

यामी गौतमच्या 'नयी नवेली' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यावर बीएमसीचा हातोडा पडला, बेकायदेशीर बांधकामाचे आरोप

पुढील लेख
Show comments