शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (14:30 IST)

काजोलला विचारले की, मुलगी न्यासा शाहरुख खानचा मुलगा आर्यनबरोबर पळाली तर ती काय करेल, व्हिडिओमध्ये तिने काय म्हटले आहे ते पहा

काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नवीन नसून जुना आहे. कॉफी विथ करण शोमध्ये जेव्हा काजोलने उपस्थिती लावली होती, या शोमध्ये काजोलसह शाहरूख (shahrukh khan) आणि राणी मुखर्जीही होते. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.
 
व्हायरल होणारा व्हिडीओ जुना असला तरी काजोलने दिलेल्या उत्तरामुळे हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल  (social media) झाला आहे. करणने काजोलला असा काय प्रश्न विचारला ज्याचा विचार ना कधी काजोलने केला असेल ना शआहरूखनने. करणने विचारले, जर १० वर्षांनंतर शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन आणि काजोलची मुलगी न्यासाला घेवून दोघे पळून गेले तर. तुमची प्रतिक्रिया काय असेल?
 
तेव्हा काजोलने दिलेल्या उत्तरावच सा-यांच्या नजरा खिळतात. काजोलने स्मार्टली दिलवाले दूल्हा ले जाएंगे। असे उत्तर दिले. काजोलच्या या उत्तरामुळे शाहरुख मात्र जरा गोंधळला आणि तो म्हणाला मला विनोद समजत नाही. मला भीती वाटते की जर काजोल माझी नातेवाईक बनली तर....मी विचारही करू शकत नाही. शाहरुखचेही प्रतिक्रीया ऐकून काजोल आणि राणी दोघेही हसू लागतात.