1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Kangana Ranaut almost signed adult film

...तर अडल्ट फिल्मने सुरुवात केली असती

गँगस्टर सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री कंगना राणावतने एक मोठा खुलासा केला आहे. जर हा सिनेमा मिळाला नसता तर कदाचित मी अडल्ट सिनेमातून करिअरची सुरुवात केली असती, असं कंगनाने सांगितलं.
 
जुन्या अनुभवांबद्दल सांगताना कंगना म्हणाली की, गँगस्टरच्या आधी मला एक अडल्ट चित्रपटाची ऑफर मिळाली होती. हा सिनेमा आपल्यासाठी योग्य नाही, हे माहीत असूनही मी तो करण्यासाठी तयार झाले. यानंतर मी एक फोटोशूट केलं. पण फोटोशूटसाठी दिलेले कपडे पूर्णत: ट्रान्सपरंट होते. ते कपडे घालणं म्हणजे न घालण्यासारखंच होतं. मग मला वाटलं की हे चुकीचं आहे. या सिनेमातून सुरुवात करू शकत नाही. हा सिनेमा सोडल्याने निर्माता माझ्यावर खूप संतापला होता. त्यावेळी माझं वय केवळ 17-18 वर्ष होतं. तेव्हा मी प्रत्येक ऑफर स्वीकारत असे, असं कंगनाने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
पुढील लेख
‘एडल्ट्स ओन्ली’चे चित्रीकरण ‘आयफोन ६’ वर