रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिनेत्री कंगना रणावत पुन्हा एकदा जखमी

‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना रणावत जखमी झाली आहे. सिनेमाची शुटिंग सुरु असताना कंगना घसरुन पडली. यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
 
राजस्थानमधील जोधपूरच्या एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. आता शुटिंग सोडून कंगना मुंबईला परतणार असल्याचीही माहिती आहे. राजस्थानमधील मेहरानगड किल्ल्यावर सिनेमाची शुटिंग सुरु आहे. दरम्यान या सिनेमाची शुटिंग करताना कंगना या अगोदरही जखमी झाली होती, ज्यामध्ये तिच्या डोक्याला पंधरा टाके पडले होते.